Share

‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना

Published On: 

🕒 1 min read

लातूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. आज त्यांनी लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली..

‘अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. नुकसानीचे पंचनामेदेखील पूर्ण झाले नसून विमा, अनुदानाचे पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोवर आम्ही सरकारला जगू देणार नाही. ठाकरे सरकार झोपलेले आहे आणि त्यांना जागे करण्यासाठी आम्ही निघालो आहोत.’ असे फडणवीस म्हणाले.

दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

‘साहेब! काहीही करा, पण आमची दिवाळी गोड करा हे आर्त स्वर काळीज चिरणारे आहेत, मनाला सुन्न करणारे आहेत अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तसेच ‘माझ्या भावांनो, कुठलाही वाईट विचार करू नका. एकमेकांना सांभाळा. आम्ही आहोत सोबत असे म्हणत शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!