मुंबई : लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. स्थानिक प्रशासनाने आता या परिसरात १४४ कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येतोय.
घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सीतापूरमध्ये ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचा खोली झाडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच खोलीत प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर नजरकैद करण्यात आलं आहे. सीतापूरमध्ये ताब्यात घेतल्यानंतर आता प्रियंका गांधींनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आपण आमरण उपोषण करणार, असे त्या म्हणाल्यात.
दरम्यान, प्रियंका गांधींच्या या व्हिडिओवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र तथा भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. ‘ही नौटंकी असली तरी मोदीजींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले. कितीही नौटंकी केली तरी ह्या देशातला मतदार हुशार आहे, त्यांना त्यांचे बरे वाईट कळते’ असे ट्विट राणे यांनी केले आहे.
ही नौटंकी असली तरी मोदीजींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले. कितीही नौटंकी केली तरी ह्या देशातला मतदार हुशार आहे, त्यांना त्यांचं बंर वाईट कळतं. https://t.co/o3iXyQGG1j
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 4, 2021
तर दुसरीकडे प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, आज सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात मुरडल्याचा आरोप उत्तर प्रदेश काँग्रेसने केला आहे. आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या तर 5 पण जागा आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं
- सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता?
- ‘उत्तर प्रदेशात तर जनरल डायरचे सरकार आहे’, बाळासाहेब थोरातांचा संताप
- ‘लक्ष्मीसाठी दार उघडा, खोट्या शपथा घ्या, पैसे घ्या, पण मतदान साबणेंना करा’, सदाभाऊंचे अजब आवाहन
- ‘..तर मी माझी मालमत्ता गिरीश महाजन यांना दान देईल’, एकनाथ खडसेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

