Share

नातवंडांना सांगू “आम्ही लतादीदी नावाच्या सरस्वतीच्या अवताराला प्रत्यक्ष पाहिलं”-सलील कुलकर्णी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आपल्या आजोबांनी आपल्याला देवदेवतांच्या गोष्टी सांगितल्या. आम्ही नातवंडांना सांगु की ..आम्ही “लतादीदी नावाच्या सरस्वतीच्या अवताराला प्रत्यक्ष पाहिलं. त्या गायच्या त्याला संपूर्ण गाणं म्हणायचं. दीदी तुम्ही नेहमी आठवणीत राहील अशा शब्दात संगीतकार सलील कुलकर्णी(Salil Kulkarni) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर कायमच्या आपल्यातून निघून गेल्या आहेत. आज (दि.६) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

क्षण अमृताचे हा लतादीदींनी केलेला शेवटचा मराठी अल्बम आहे. या अल्बमसाठी संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले होते. हा अल्बम २०१३ मध्ये पुणे येथे प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे या अल्बमचे प्रकाशन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले होते. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे या अल्बम मधील गीताचे बोल होते. त्यावेळी सलील कुलकर्णी आणि लतादीदींनी सोबत काम केले होते. त्या आठवणींना सलील कुलकर्णी यांनी उजाळा दिला.

गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. सहा दशकांपेक्षा अधिक काळ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादिदींची दोन गाणी हॉलीवूड चित्रपटातही वाजली आहेत. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले. या मराठी गाण्यापासूनच दिदींच्या करिअरला सुरुवात झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!