Share

खा. सुप्रिया सुळेंचे श्री संत तुकाराम महाराजांना साकडे, संस्थान अध्यक्षांशी केली चर्चा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. तसेच संस्थानच्या विश्वस्त मंडळाशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. संस्थानाच्या विकासाबाबत अश्वासन दिले. यावेळी संस्थानाच्या वतीने त्यांना तुकाराम महाराजांचा अभंग संच भेट देण्यात आला. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, श्रीक्षेत्र देहू येथील ‘गाथा प्रसाद’ चे श्री. विनायक सुरेंद्र गोलांडे यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संच असलेले सार्थ अभंगगाथा हे पुस्तक भेट दिले. मोरे पुष्प भांडारच्या शुभांगी निवृत्ती मोरे यांनी प्रसादाचा लाभ दिला. दोघांचे मनापासून आभार.

श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे व सहकारी उपस्थित होते. श्रीक्षेत्र देहू येथे विठू माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे व सहकारी उपस्थित होते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!