Share

राज्यात निर्बंध शिथील बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती

Published On: 

पुणे: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना (Corona) तसेच ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याची लागण होऊ नये म्हणून शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सध्या आता राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याची चर्चा सुरू आहे. तसेच या बाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर आले होते. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, पण आता तशी परिस्थिती नाही.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्र, अशी चर्चा झालीच नाही. मी केवळ एवढीच विनंती केली की, युरोपीय देशांमध्ये ज्याप्रमाणे करोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत त्यावरुन आपल्याला बोध घेता येईल का, याचा विचार व्हावा, असं राजेश टोपे यांनी बैठकीत सांगितले असल्याचे टोपे म्हणाले.

इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड आणि ब्रिटनमध्ये करोना निर्बंधांबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तेव्हा केंद्रीय टास्क फोर्स आणि राज्य टास्क फोर्सने हे निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आले याचा अभ्यास करावा. जेणेकरुन त्यामधून आपल्याला काही बोध घेता येईल. यामध्ये मास्कमुक्तीचा निर्णय नव्हे तर इतर निर्बंध कमी करता येतील का, याचा अभ्यास झाला पाहिजे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्याने विनंती करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!