🕒 1 min read
मुंबई: सध्या वाईनसंबंधी निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये (Wine sales in supermarkets)देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून यावरच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (BJP leader Gopichand Padalkar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“जनाब संजय राऊत (sanjay raut) हे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गावे अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही.”, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
जनाब @rautsanjay61 झिंग झिंग झिंगाट झाले आहेत.मा.@PawarSpeaks नावाचा वापर करून ते #वाईन विक्रीचं समर्थन करतायत.जे #पवारांनी आयुष्यात सोसलं आहे,त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केली आहे,त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या युवा पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.@BJP4Maharashtra pic.twitter.com/Q6RjnksZXp
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) January 29, 2022
तसेच शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करत आहात. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे .त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत. असे पडळकरांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “क्रांती एकदाच झाली त्यामुळे त्याचा पार्ट २ योग्य नाही, त्यापेक्षा “मी पुन्हा येईन” हा चित्रपट काढावा”
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे- चंद्रकांत पाटील
- “..तर सचिनने १ लाख शतक केले असते ” शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य
- “लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणारे न्यायाधीश संपवले पाहिजे”, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
- “वाईन विक्रीचा निर्णय संजय राऊत शेतकरी हिताचा सांगताहेत, जनता एवढी दुधखुळी नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
