Share

OBC Reservation : “निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यामध्ये सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका  पावसाळ्यानंतर घेण्यात येणार आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत ओबीसी आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी त्यांनी मध्यप्रदेशच्या धर्तीवर प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ, मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!