Share

“संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिम..”, भाजपच्या महिला मंत्र्याचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशात सध्या एक घटना चांगलीच चर्चेत आहे. उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथे ज्ञानवापी मशिदीखाली सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याने देशभरात एकच चर्चा रंगली आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र सध्या भाजपच्या एका महिला मंत्र्याचे वक्तव्य चांगलेच चर्चेत येत आहे.

मध्य प्रदेश सरकारमधील पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर (Minister Usha Thakur) यांनी म्हटले की, “मुलांवर धार्मिक संस्कार करणे ही पालक आणि कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी आहे. जर तुम्हाला संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिमांना तुमचा आदर्श बनवा. कारण ते नमाजासाठी ठरलेल्या वेळेत सर्व कामे सोडून नमाज पठण करतात. मग ती लहान मुलं असो किंवा मोठी मुलं, अधिकारी असो किंवा व्यापारी, सर्वजण वेळेवर पोहोचतात.” उषा ठाकूर खंडवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

तसेच पुढे त्या म्हणाल्या की, “आपल्याला गावामध्ये मंदिरे बांधायची असतात.  पण आरतीला जाण्यात रस नसतो. आरतीला  न जाता चौकाचौकात बसून गप्पा मारणार, पण मंदिरात जाणार नाही. हेच करायचं होतं, तर मंदिरं का बांधली?”, असा प्रश्नही मंत्री उषा ठाकूर यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!