मुंबई : कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करून कलावंतांचा यथोचित गौरव राज्य शासनातर्फे करण्यात येतो. मात्र यावर्षी कोविड-१९ या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आयोजनांवर आलेल्या बंधनांमुळे सांस्कृतिक कार्य विभागाला विविध पुरस्कार प्रदान सोहळे सध्या आयोजित करता येणे शक्य नसल्याने यावर्षीच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार – ह.भ. प. बद्रिनाथ महाराज तनपुरे, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार – दिवंगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार – ज्येष्ठ कलाकार गुलाबबाई संगमनेरकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना घोषित करण्यात आले असून लवकरच सर्व मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, शासनाच्या नियमांचे पालन करून पुरस्कार प्रदान सोहळे आयोजित करता येतील आणि मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येऊ शकतील”, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- वयाच्या २१ व्या वर्षी ‘ती’ झाली देशातील सर्वात तरुण महापौर !
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- न्याय, पैसा, हमीभाव आणि सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी,प्रीतम मुंडेंचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

