Share

वयाच्या २१ व्या वर्षी ‘ती’ झाली देशातील सर्वात तरुण महापौर !

Published On: 

तिरुअनंतपुरम : तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितले जाते. मात्र हीच तरुणाई अनेकदा देशातील राजकीय विषयांवर उदासीन असल्याने राजकारणातील तरुणांचा सहभाग कमी असलेला दिसून येतो. मात्र देशात राजकीय बदलांना हीच तरुणाई महत्वाची भुमिका बजावतात.

यावेळी केरळच्या तिरुअनंतपुरमची रहिवासी असलेल्या २१ वर्षांच्या आर्या राजेंद्रन हीने देशात सर्वात तरुण महापौर होण्याचा एक नवा इतिहास रचला आहे. आर्या राजेंद्रन सध्या बीएससी गणिताची विद्यार्थिनी आहे. तिरुअनंतरपुरम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिनं पहिल्यांदाच मतदान केलं होतं आणि ती उमेदवार म्हणूनही उभी राहिली होती. आता ती चक्क महापौरपदी विराजमान होणार आहे. ती केरळची आणि देशातील सर्वात तरून महापौर झाली आहे.

आर्याचे वडील इलेक्ट्रिशियन तर आई एलआयसी एजंट म्हणून काम करतात. आर्या सीपीएम पक्षाच्या तिकीटावर मुडावनमुगल विभागातून निवडून आलीय. २१ डिसेंबर रोजी तिचा शपथविधीही पार पडला. आता, सीपीएमकडून आर्य राजेंद्रन हिची महापौरपदी निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे देशातील साक्षरतेच्या प्रमाण सर्वात जास्त असल्याने देशातील सुशिक्षित आणि तरुण नेतृत्व देण्याच्या आणखी एक मानाचा तुरा केरळच्या शिरपेचात खोवला गेला आहे. पक्षाच्या जिल्हा समिती आणि राज्य समितीनंही आर्याला महापौरपदासाठी हिरवा कंदील दाखवलाय. यामुळे, अधिक सुशिक्षित महिला नेतृत्वासाठी समोर येतील, अशी आशा पक्षाकडून व्यक्त करण्यात येतेय.

‘महापौरपदाचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. मी त्याचं पालन करीन. निवडणुकीदरम्यान जनतेनं मला पसंती दिली कारण मी एक विद्यार्थी आहे आणि लोकांना एक शिक्षित व्यक्ती प्रतिनिधी म्हणून हवा होता. मी माझे शिक्षण सुरू ठेवतानाच महापौर म्हणून माझी कर्तव्यं पार पाडणार आहे’ असं आर्या राजेंद्रन हिने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!