मुंबई : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अर्थात येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील खोचक अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगना ट्विट मध्ये म्हणाली, ‘मेरी ख्रिसमस फक्त त्यांना जे सर्व भारतीय सणांचा आदर करतात. मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत,’ असा शब्दात कंगणाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Merry Christmas to only those who respect and accept all Indian festivals. Merry Christmas to only those who don’t do selective activism only around Hindu festivals ❤️ pic.twitter.com/GoTT5iLlIH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 25, 2020
दरम्यान, ‘थलाइवी’ हा कंगणाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कंगणाने तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांंचं पात्र साकारलं आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक ए.एल. विजय करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटी सामन्यातील चार बदलांवर गंभीर म्हणाला…
- ‘राहुल गांधी यांची चेष्टा होते, ममता बॅनर्जींची कोंडी होते’; शिवसेनेचं टीकास्त्र
- दाक्षिणात्या सुपरस्टार अनिल नेडुमंगड यांचा धरणात बुडून मृत्यू
- वयाच्या २१ व्या वर्षी ‘ती’ झाली देशातील सर्वात तरुण महापौर !
- शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले


