नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
२६ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर अनेक गंभीर प्रश्न उठवले गेले. तर, या घटनेनंतर पुन्हा होणारा संघर्ष टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर रोडवर टोकदार खिळे ठोकले होते. खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले. यानंतर, विरोधकांसह नागरिकांनी देखील या कृत्यावरून दिल्ली पोलीस व केंद्र सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती.
यानंतर, हे खिळे हटवण्यात आल्याचे समजत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपण फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचं राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, शेतकरी नेते आता सरकारला गांधीगिरीने उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिरासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- चीनच्या लसीवर विश्वास नाही : पाकिस्तान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

