नवी दिल्ली : मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी पदोन्नती मध्ये आरक्षणाचा कायदा करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत केली आहे. पदोन्नती मध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात यावी ही मागणी मागासवर्गीयांमधून गेली अनेक वर्षे केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेत भाग घेताना रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचे दिशा दर्शन करणारे असल्याचे सांगत राष्ट्रपतींच्या भाषणाचे रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
यासोबतच, आगामी जनगणना ही जाती आधारित करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच महाराष्ट्रात मराठा, उत्तर प्रदेशात ठाकूर, हरियाणा मध्ये जाट आणि राजस्थान मध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 10 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत केली. याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- देव तारी त्याला कोण मारी, मुंडेंनी केला ‘त्या’ संकटाचा उल्लेख
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

