५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.
या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.
अयोध्येत राम जन्मभूमी येथे राम मंदिर नव्याने उभारण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या संख्येने देणग्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जवळपास सहाशे कोटींचा निधी संकलित झाला आहे. यातील १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट चेकद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, शक्तिमान म्हणून देशभर परीचीती असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनीही राम मंदिरासाठी निधी अर्पण केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ही माहिती दिली आहे.
‘अयोध्येचे श्रीराम मंदिर मोदी सरकारच्या पुढाकाराने पुन्हा थाटाने उभारले जात आहे. महाभारतातील भीष्माचार्यांची भूमिका साकारलेले सुप्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी या कार्यासाठी ₹ १,११,१११/- चा रामनिधी आज अर्पण करून या अभियानात सहभाग घेण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला’, अशा आशयाचे ट्वीट करत भातखळकर यांनी ही माहिती शेअर केली.
महत्वाच्या बातम्या
- 4जी मुबारक! 550 दिवसांनी जम्मू-काश्मीरला बहाल झाली हायस्पीड इंटरनेट सेवा
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

