इस्लामाबाद : आर्थिक दृष्ट्या चीनच्या मदतीवरच अवलंबून असणाऱ्या पाकिस्ताननेच आता चीनच्या लसीवर शंका उपस्थित केली आहे. चीनची सायनोफार्म लस साठ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांवर परिणामकारक नाही असा थेट वक्तव्य पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तानने हे विधान कोरोना लसीकरण अभियानाला सुरूवात केल्यानंतर केले. त्यांनी गुरूवारी म्हटले की चीनचे सायनोफार्म ही लस ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभावी नाही. चीनने पाकिस्तानला पाच लाख लसी दिल्या आहेत.
पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्य प्रकरणातील विशेष सहाय्याक डॉक्टर फैसल सुल्तान यांनी आज सांगितले की, पाकिस्तानच्या तज्ञ समितीने डेटाच्या सुरूवातीच्या विश्लेषणानंतर हा सल्ला दिला आहे की ही लस केवळ १८ ते ६० या वयोगटातील लोकांनाच दिली जावी.
या लसी घेण्यासाठी पाकिस्तानातून विमान गेले होते. चीनने भलेही २१ कोटींची लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला केवळ पाच लाख लसींची पूर्तता केली होती. मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात तेव्हाच सांगितले होते की पाकिस्तानने आपले विमान पाठवत आपल्या खर्चाने लस घेऊन जावी.
पाकिस्तानला भारताकडून १.७० कोटी लसी मोफत दिल्या जाणार आहेत. यात कोवॅक्स प्रोग्रामअंतर्गत पाकिस्तानला ही खैरात दिली जाणार आहे. पाकिस्तानने सगळ्यात आधी ऑक्सफर्ड ऍस्ट्राजेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून तयार करण्यात आलेल्या कोविशील्डला आपात्कालीन मंजुरी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- 4जी मुबारक! 550 दिवसांनी जम्मू-काश्मीरला बहाल झाली हायस्पीड इंटरनेट सेवा
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय


