Share

बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?

Published On: 

पुणे : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आज या संपूर्ण चर्चेवर पूर्णविराम लागलेला आहे. आज दुपारी नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष तर त्यांच्या दिमतीला ६ कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे. यामध्ये दोन नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष हे पुण्यातील आहेत. रमेश बागवे, मोहन जोशी या पुण्यातील दोन बड्या नेत्यांना पक्षाने संधी दिलेली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता वर्षभरावर आलेल्या आहे. आणि अशातच पुण्यामध्ये काँग्रेसचे दोन प्रदेश उपाध्यक्ष असणार आहेत. यामुळे पुणे कॉंग्रेसला २०२२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये या दोन बड्या नेत्यांचा कितपत फायदा होणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या पुणे शहरामध्ये कॉंग्रेसची परिस्थिती ही काहीशी बिकटच आहे असं म्हणले तर वावगे ठरणार नाही.

२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला केवळ ११ नगरसेवक निवडून आणता आले होते, तर भाजपचे ९८ नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर कॉंग्रेस अजूनपर्यंत तरी मरगळ आलेल्या स्थितीतच असलेली पाहायला मिळत आहे.

रमेश बागवे यांच्याकडे सध्या पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष पद देखील आहे. व आता त्यांची निवड काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. यामुळे आता रमेश बागवे या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशवी होणार का? कि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बागवे व जोशींची नियुती केल्याने तरी २०२२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला उभारी मिळेल का? कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ आता तरी दूर होईल का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!