Share

‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, उर्जामंत्र्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

अहमनदनगर : शेतकऱ्यांच्या भावना, संवेदना लक्षात घेऊन आम्ही काम करतो. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. मंत्री तनपुरे हे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक लहामगे, किसन कोपनर आदी उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, गेल्या काही वर्षांत शेतीचा लोड वाढला, त्या प्रमाणात महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढले नाही, पायाभूत सुविधांची कामे झाली नाहीत. त्यामुळे फिडर आिण सबस्टेशन ओव्हर लोड झाले. महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चुकीची कामे होत आहेत. यावर गेल्या काही वर्षांत जरब बसला नाही. हे होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती यापूर्वी दिसली नाही, अशी टीका त्यांनी केली. आता हे चित्र बदलत आहे, असे तनपुरे म्हणाले.

अनेक महिने मागणी करूनही, बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळत नाही. अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी करतात. रिक्त पदांची समस्या असतानाच काही जण अनेक वर्षे जागीच बस्तान ठोकून आहेत, अशा आरोपांच्या फैरी सामान्य लोक झाडत असल्याने, आपल्याच विभागातील कारभार चव्हाट्यावर येत असल्याने हताश झालेल्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, तुमच्या अशा वागण्याने ऊर्जा खात्याची मान शरमेने खाली जात असेल तर ही बाब गंभीर आहे. दोन महिन्यांत कारभारात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!