मुंबई : आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. भाजपने (bjp) आपले ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ६ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस चांगलीच वाढली आहे. महाविकास आघाडीने राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी कंबर कसली आहे.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी विधानभवनामध्ये हजर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. तसेच त्यांनी यावेळी भाजप आणि विरोधी पक्षघानेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले कि, भाजपा अतीआत्मविश्वास दाखवत असून राज्यसभेला केलेली चूक आम्ही यंदा करणार नाही, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
तसेच पुढे बोलताना रोहित पवार यांनी दवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनची आठवण करुन देत त्यांना अतीविश्वास वाटतोय असा टोलाही लगावला. राज्यसभेने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. विरोधी पक्ष कुठल्याही स्थराला जाऊ शकतो. शिवाय आमदारावर दबाव आणू शकतात. तसेच गेल्या वेळी निवडणूक आयोगापर्यंत प्रकरण गेलं होतं. पण आम्ही राज्यसभेचा निकाल स्वीकारला, असं पवार म्हणाले.
मात्र मागील निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळण्याची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे. आमदारांबद्दल विचाराल तर आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बाजूने आहोत. गेल्या वेळेस एक मत बाद झालं तर सगळं समिकरण बदललं. या वेळेस प्रत्येक मताची काळजी आम्ही सर्वांनी घेतलीय, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

