Share

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा साई पल्लवीला पाठिंबा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट पर्वम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा वाद सुरु झाला आहे. पण आता साई पल्लवीच्या वक्तव्याला प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दिला आहे.

साई पल्लवीनं एका पोस्टमध्ये आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिने लिहिले की, “मी या नरसंहाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली नाही. तर मला हे सर्व पाहून मी लॉकडाऊनमध्ये ज्या घटना पाहिल्या त्या आठवल्या. कोणत्याही प्रकारची हिंसा ही नेहमीच चुकीची आहे आणि आपल्या धर्मात तर हे पापच आहे.” या पोस्टवर प्रकाश राज यांनी कमेंट करत साईला पाठींबा दिला आहे. प्रकाश यांनी साई पल्लवीची ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘माणुसकी सर्वात पहिली असायला हवी. माझा तुला पाठिंबा आहे साई पल्लवी’.

या वक्तव्यामुळे साई पल्लवी अडकली वादाच्या भोवऱ्यात –

”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!