Share

आम्ही या पेक्षा जास्त लॉकडाऊन पाळू शकत नाही!

Published On: 

औरंगाबाद : आम्ही या पेक्षा जास्त लॉकडाऊनचे अनुसरण करू शकत नसल्याचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. खासदार जलील यांनी या आधी देखील कडक लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन शिवाय कोणताही दुसरा पर्याय नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. हे वृत्त येताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही पोस्ट केली आहे. औरंगाबाद शहरातील अनेक नागरिक लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न आधी मार्गी लावा आणि नंतरच लॉकडाऊन करा अशी भूमिका खासदारांनी या आधीही घेतली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी औरंगाबाद प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनलाही त्यांनी विरोध केला होता. त्याच वेळी त्यांनी मोर्चा काढण्याची तयारी देखील केली होती.

मात्र, सर्वच लोकप्रतिनिधी दबाव टाकत असल्याने आधी औरंगाबाद जिल्ह्यात लावण्यात आलेले लॉकडाऊन उठवण्यात आले होते. त्यामुळे खासदार जलील यांनी मोर्चाही रद्द केला होता. मात्र, आता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढे लॉकडाऊन आम्ही पाळू शकत नसल्याचे खासदारांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!