मुंबई : रेमडेसिविर लस आमच्या घरात तयार होत नाही, असे सांगून मंत्री छगन भुजबळ यांनी संकटात सापडलेल्या जनतेच्या दु:खावर मीठ चोळले असल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. भुजबळ यांच्या वक्तव्यावर त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांनी नाशिककरांची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील भातखळकर यांनी केली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने नाशिक मधील नागरिकांनी भुजबळांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी बोलतांना भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. त्यावर रेमडेसिविर जर तुमच्या घरात तयार होत नसेल तर कोरोना लस मोदीजींच्या घरात तयार होते का? असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. सत्तेचा माज चढलेल्या मंत्र्यांनी या
रेमडेसिविर लस आमच्या घरात तयार होत नाही सांगून छगन भुजबळ यांनी संकटात सापडलेल्या जनतेच्या दुःखावर मीठ चोळले आहे.
मग कोरोनाची लस मोदीजींच्या घरात तयार होते का? याचेही उत्तर सत्तेचा माज चढलेल्या मंत्र्यांनी द्यावे. ठाकरे सरकारच्या बेशरमपणाला मर्यादा उरलेल्या नाहीत. pic.twitter.com/KTHsb6UFW4— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 10, 2021
राज्यात सध्या रेमडिसिविर इंजेक्शन आणि कोरोना लस दोन्हींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. यात सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत आरोग्य विषयक गरजांकडे मात्र, कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मी काय फार मोठा माणूस नाही, लसीकरणावरून होणारे राजकारण थांबवा; राजेश टोपे हळहळले
- छगन भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रवीण दरेकरांनी केला निषेध
- रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ!
- मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर
- नाभिक समाजाकडून ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


