Share

‘गर्दी करून प्रचार सभा घ्यायच्या आणि महाराष्ट्राला घरात बसायचे धडे द्यायचे’

Published On: 

मुंबई : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोत्नीव्द्नुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एका बाजूला महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी टाळेबंदी करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लावून सर्वसामन्यांना नियमांचे पालन करायला राज्यकर्ते सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीच जर अशा पद्धतीने नियम मोडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाहायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होत होता.

हे सर्व प्रकरण सुरु असतानाच आज अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. ‘लॉकडाऊन बाबत आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल’ असे वक्तव्य त्यांनी आज केले होते.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांना चांगलीच चपराक लगावली आहे. ‘अजित पवार निर्णय काही असो पण तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. गर्दी करून प्रचार सभा घ्यायच्या तुम्ही आणि महाराष्ट्राला घरात बसायचे धडे तुम्हीच द्यायचे, हे नाटक बंद करा. राज्य सरकारने महाराष्ट्राला संकटात आणले, सरकार बरखास्त करून घरी बसा महाराष्ट्र आपोआप ठीक होईल.’ अशा आशयचे ट्वीट करून त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!