मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपने वारंवार ते न टिकण्याच्या किंवा ते सरकार अपयशी असून लवकरच पडणार असल्याच्या टीका केल्या. मात्र महाविकास आघाडी सरकार अद्यापही सत्तेत टीकून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल असे वक्तव्य जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घातला. यावेळी त्यांचे फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मंत्री पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रकरणी मंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मागच्या काळात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजला होता. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रचंड मोठे दुर्लक्ष तत्कालीन सरकारने केले होते. आमच्या सरकारने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले आहे.
कलानीसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही..
उल्हासनगरात कार्यकर्त्यांची बैठक संपल्यावर माजी आमदार पप्पू कलानी यांनी चहा करीता मला बोलवले होते. त्याठिकाणी चहापानासाठी मी गेलो होते. मात्र कलानी यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचा खुलासा मंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- किरण गोसावी यूपी पोलिसांना जाणार शरण; काय असेल कारण??
- महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप
- कोण ढ, कोण हुशार? ..एकाच बाकावर विद्यार्थी दोन!
- समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही? याबाबत गृहमंत्र्यांचंं सूचक वक्तव्य
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

