🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. ‘प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल’ असं महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. तसंच, या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिकांचा बार लावला आहे. त्यातच पंच प्रभाकर साईलने खंडणीचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. ‘प्रभाकर साईल याने संरक्षण मागितले होते त्यांना पोलीसांना संरक्षण दिले आहे. त्याने जे काही आरोप केले आहे ते गंभीर आहे जर प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, असं स्पष्टपणे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, नवाब मलिकांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी जुजबी चर्चा झाली, या विषयावर चर्चा झाली नाही, दुसर्या विषयाबाबत बैठक होती, असंही वळसे पाटलांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- ‘नानाभाऊ पटोलेचं आता निवडून येणार!’, भीमगायिका कडुबाईंनी गायनातून व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
