मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत .नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखेडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकार ने संरक्षण द्यावे. समीर वानखेडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
प्रभाकर साईलचा समीर वानखडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडियो समोर आला आहे. प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या समीर वानखडे यांच्या विरुद्ध षडयंत्र असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत. याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी रामदास आठवलेंनी केली आहे.
प्रभाकर साईलचा समीर वानखडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडियो समोर आला आहे. प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या समीर वानखडे यांच्या विरुद्ध षडयंत्र असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी च्या दाबावातून साईल ने आरोप केले असावेत.याची चौकशी व्हावी.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 25, 2021
दरम्यान, नवाब मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई हा समीर वानखेडे यांच्या कर्तव्याचा भाग होता .नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखेडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- सणोत्सवांच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करा – भुजबळ
- भारतावर दणदणीत विजय मिळवूनही पाकिस्तानने ड्रेसिंग रूममध्ये केले नाही सेलीब्रेशन; कारण वाचून वाटेल अभिमान


