Share

किरण गोसावी यूपी पोलिसांना जाणार शरण; काय असेल कारण??

Published On: 

मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातलं आणखी एक वादग्रस्त नाव म्हणजे किरण गोसावी आहे. एनसीबीचे पंच म्हणून या सगळ्या कारवाईत त्यांचा सहभाग होता. तर शाहरुखकडून खंडणी मागण्यात देखील किरण गोसावींचा सहभाग होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. राज्यातही अनेक गुन्हे किरण गोसावींवर दाखल आहेत. पुण्यातील एका प्रकरणात हेच किरण गोसावी आता उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये शरण येणार आहेत, अशी माहिती किरण गोसावी यांनी दिली आहे.

पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपामुळं किरण गोसावी पुन्हा चर्चेत आले होते. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला एनसीबीचे पंच म्हणून किरण गोसावी यांनी कॉर्डिलिया क्रुझवर छापा मारला होता. त्याच छाप्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला होता. त्याच्या हाताला धरुन घेऊन येतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर किरण गोसावी एनसीबीच्या कोणत्याही पदावर नसताना, कारवाईमध्ये कसे होते? असा सवाल विचारला गेला. तेव्हापासून किरण गोसावी बेपत्ता झाले.

किरण गोसावी याच्या मागावर पुणे पोलिसांची पथके आहेत. त्यांना गुंगारा देणारा गोसावी आज माध्यमांसमोर प्रगट झाला. त्याने प्रसाधमाध्यमांशी संपर्क साधून आपण आजच उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले. गोसावीविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या प्रभाकर साईल यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गोसावी प्रगट झाला हे विशेष.

गोसावी याने अनेक धक्कादायक दावे करत आपण समीर वानखेडे यांना ओळखतच नसल्याने बिनदिक्कतपणे सांगितले. तसेच साईल हा पैशाची मागणी करत असल्याचा प्रत्यारोप केला. या साऱ्या परिस्थितीत त्याने मुंबई किंवा पुणे पोलिसांसमोर शरण न येता उत्तर प्रदेश पोलिसांसमोर शरण येण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!