नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर आहे.
ऑगस्ट महिन्यात दरवर्षीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला आहे. पण सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मात्र राज्यातील काही भागांत कमी पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान राज्यातील जळगाव, कन्नड, चाळीसगाव या भागात मुसळधार पाऊस पडला आहे. तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांचा गंभीर आरोप! ‘खा.भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांचा पीए सईद खानच्या नावे केली’
- मराठा आरक्षण : संभाजीराजे उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट; राज्यातील प्रमुख पक्षांचे ‘हे’ नेते असणार सोबत
- सोमय्यांनी जाहीर केलं बारावं नाव; आता जितेंद्र आव्हाडांच्या मागे लागणार ईडीची पिडा ?
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत ; हिंमत असेल तर गोरेंवर कारवाई करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

