Share

काबुल विमानतळ बंद ; हजारो परदेशी नागरिक पडले अडकून

Published On: 

नवी दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानने काबूल विमानतळ ताब्यात घेतला आहे आणि आता त्यांनी हे विमानतळही बंद केले आहे. त्यानंतर भीतीने लोक देशालगतच्या सीमेकडे धावत आहेत, जेणेकरून ते देश सोडून जाऊ शकतील. अफगाणिस्तान हा लँडलॉक देश आहे आणि त्याची सीमा इराण, पाकिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोकांना आता या देशांमध्ये जावे लागत आहे.

आतापर्यंत या विमानतळावर अमेरिकेचा ताबा होता. या विमानतळाचं व्यवस्थापनदेखील अमेरिकेकडून केलं जात होतं. मात्र आता अमेरिकेनं माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तालिबानच्या ताब्यात आलं असून सध्या ते बंद ठेवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अद्यापही हजारो परदेशी नागरिक अडकून पडले आहेत.

अनेक अफगाणी नागरिकांना देखील देश सोडून बाहेर पडण्याची इच्छा आहे. हे सर्व नागरिक सध्या पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर गर्दी करत असल्याचे दिसत आहे. हवाई मार्गे बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे आता पाकिस्तान किंवा इराणमार्गे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात हजारो नागरिक असल्याचं चित्र आहे. इराणकडून नियम शिथील इराणनं सीमाभागातील नियम काही काळापुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी काबूलमधून 1,23,000 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. पण तरीही हजारो लोक इथे अडकले आहेत. गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी उच्चायोगाने (यूएनएचसीआर) म्हटले की परिस्थिती सुधारली नाही तर आणखी पाच लाख लोक अफगाणिस्तान सोडू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!