मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांची अमेरिकेतील पीएच.डी. साठीची रजा मंजूर केली आहे. रणजित डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी नामंजूर केल्याने मोठे वादंग उठले होते. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. अखेर वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज मंजूर केल्याने या वादावर काही प्रमाणात पडदा पडला आहे. आता रणजित डिसले यांनी ट्विट करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार मानले आहेत.
माननीय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो। या निर्णयामुळे फुलब्राइट स्कॉलरशिप ची संधी हुकणार नाही, याचा आनंद आहे।
यानिमित्ताने मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो https://t.co/KBV7hQ0GE3— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) January 22, 2022
रणजित डिसले ट्विट करत म्हणाले, ‘माननीय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. या निर्णयामुळे फुलब्राइट स्कॉलरशिपची संधी हुकणार नाही, याचा आनंद आहे. यानिमित्ताने मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.’
डिसले गुरुजींची रजा मंजूर केल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे. वर्षा गायकवाड ट्विट करत म्हणाल्या, ‘सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक रणजित डिसलेजी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.’, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्य- संजय राऊत
- “ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
- Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
- सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
- “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप


