🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात राजकीय खेळाला कलाटणी मिळताना दिसत आहे. शिंदे गटात फूट पडल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सीआरपीएफ सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत १५ बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ चे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात चालेल्या वादाविषयी अब्दुल सत्तार यांनी खदखद व्यक्त केली आहे.
“आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. पण आम्हाला कधी वेळ मिळत नाही, कधी बोलण्याची संधी मिळत नाही, आमच्या कोणत्याही कामाची चर्चा होत नाही. प्रत्येकवेळी आम्हाला एखाद्या भिकारी सारखे भीख मागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्यथा एवढा मोठा उद्रेक कधीही झाला नव्हता”, असे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खदखद व्यक्त केली.
दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंड आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्यात येरवडा येथे एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळत आणि फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी या मुस्लिम शिवसैनिकांनी मंत्री अब्दुल सत्तार याच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही केली. अनाथांचा नाथ एकनाथ यांचा हिंदुत्व एकवेळा आम्हाला समजू शकतो पण अब्दुल सत्तार यांचा हिंदुत्वाशी काय संबंध? राज्यातील मुस्लिम समाज हा काल ही शिवसेना बरोबर होता आजही आहे आणि उद्याही राहणार असल्याचं यावेळी मुस्लिम शिवसैनिकांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
