Share

Rashmi Thackeray : शिवसेना वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. शिवसेनेला वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेली शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात चेक अँड मॅचचा राजकीय खेळ सुरू आहे. शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना पत्नी रश्मी ठाकरे यांची साथ लाभली आहे. बंडखोर आमदारांना समजवण्यासाठी त्यांनी आघाडी घेतली आहे. रश्मी ठाकरे या बंडखोर आमदारांच्या पत्नीच्या संपर्कात आहेत आणि त्यांना त्यांच्या पतींचे मन वळवण्यास सांगत आहेत.

रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत आहेत. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत यावं अशा सूचना रश्मी ठकारे करताना दिसत आहेत. त्याचवेळी, उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे वाढत आहे, तसतशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहे.

एकीकडे शिवसेनेतून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत आहे तर दुसरीकडे त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मन वळवण्यात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना यश मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!