Share

Sanjay Raut : “शिवसेना म्हटलं की मोदी-शहाही रस्ता बदलतात”, ; संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील राजकीय सूत्रे हलली आहेत. महाविकास आघाडी सरकारलाही याचा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना तसेच मविआ नेत्यांच्या अनेक बैठका ऑनलाईन सभा होत आहेत. या पार्श्वभूमीवरच आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे. दहिसरमध्ये शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.

“ज्यांनी बाळासाहेबांचे शाप घेतले ते संपले. एका बापाचे असाल तर राजीनामा द्या आणि समोर या. आमच्या नजरेला नजर मिळवण्याची त्यांच्यात हिमत नाही. कारण ही शिवसेना आहे. अनेक विष पचवून उभी राहिलेली ही शिवसेना आहे. कुणालाही न घाबरणारे हे वाघ आहेत. शिवसैनिकाला पाहिल्यावर मोदी आणि शहाही रस्ता बदलतात. ही शिवसेनेची ताकद आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, “कुणाची हिंमत नाही आमच्या दंडाला हाथ लावण्याची, आमच्या नादाला लागू नका. वेळ पडलीतर   झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल. अशीही शिवसेना आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!