Share

Shivsena : पुण्यात शिवसैनिकांच्यावतीने एकनाथ शिंदेंच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय खेळाला कलाटणी मिळताना दिसत आहे. शिंदे गटात फूट पडल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सीआरपीएफ सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत १५ बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ चे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान पुण्यात आज शिवसैनिकांच्यावतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंड आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्येयात येरवडा येथे एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळत आणि फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी या मुस्लिम शिवसैनिकांनी मंत्री अब्दुल सत्तार याच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही केली. अनाथांचा नाथ एकनाथ यांचा हिंदुत्व एकवेळा आम्हाला समजू शकतो पण अब्दुल सत्तार यांचा हिंदुत्वाशी काय संबंध? राज्यातील मुस्लिम समाज हा काल ही शिवसेना बरोबर होता आजही आहे आणि उद्याही राहणार असल्याचं यावेळी मुस्लिम शिवसैनिकांनी म्हटले आहे.

मुंबई, नागपूरसह अनेक शहरांत शिंदे यांच्या विरोधात निदर्शने

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक रविवारी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांचा निषेध करत आहेत. मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आल्या असून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!