Share

रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : नांदेड विभागात कोरोना पूर्वी दररोज १ लाख १० हजार प्रवाशी नांदेड विभागातील १४४ रेल्वेतून प्रवास करीत होते. सध्या ८० रेल्वेतून फक्त ७ हजार २०० प्रवासी प्रवास करित आहेत. सध्या आरक्षित रेल्वे प्रवाशांनाच रेल्वेत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थिती नांदेड विभागातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर गर्दी नाही, तसेेच गर्दीची संख्या पाहता प्लॅटफॉर्म तिकीट दरात ३० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिली.

नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी ९ एप्रिल रोजी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले. नांदेड रेल्वे विभागातून धावणार्‍या कुठल्याही रेल्वेत तसेच रेल्वे स्थानकावर गर्दी सारखी परिस्थिती नाही. सोशल मिडिया मध्ये गेल्या वर्षी चे काही व्हिडीओ पसरविल्या जात आहेत. जे चुकीचे आहेत.

कोविड-१८ च्या प्रभावापूर्वी नांदेड रल्वे विभागात सरासरी १.१० लाख प्रवाशी दररोज प्रवास करत होते ते आत्ताच्या परिस्थितीत फक्त ७५०० एवढे कमी झाले आहे. तेव्हा गर्दीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नांदेड रेल्वे विभागात सर्व रेल्वे गाड्या सुरळीत पणे सुरु आहेत. सध्या नांदेड रेल्वे विभागातून ८० रेल्वे धावत आहेत. यातील ४६ नांदेड रेल्वे विभागातून निघतात तर ३४ नांदेड रेल्वे विभागातून जातात. या सर्व रेल्वे गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये आरक्षण असलेल्या प्रवाशालाच प्रवेश दिला जातोय.

१२१ रेल्वेद्वारे चार हजार टन कृषी मालाची वाहतूक

सिंग यांनी सांगितले की, या वर्षी ५ जानेवारीला सुरु झालेल्या रेल्वे ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ७ एप्रिल पर्यंत १२१ रेल्वेंनी ४००९५ टन कांदा, द्राक्षे आणि टरबूज देशात विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. तसेच मालटेकडी, परभणी, बासमत, आदिलाबाद, हिंगोली, वाशीम, जालना, शिवानी शिवापूर आदी स्थानकावरून हि मालवाहतूक वाढविण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!