Share

मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत काल मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत देखील लॉकडाऊनबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती आहे. सध्या राज्यात कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार होते मात्र ते उपस्थित राहिले नसल्याने अनेक चर्चना उधान आले होते. पण आज राज राज ठाकरे अॅडमिट असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्या हातावर शस्त्रक्रिया होत आहे. त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.

दरम्यान, बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे अध्याप 1200 मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!