Share

आम्हीही दररोज खोटे पुरावे सादर करू शकतो – यास्मीन वानखेडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी प्रकाश झोतात आलेले एनसीबी चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात काही वाकयुद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. या सर्व गोष्टी वर आता समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांना मिळत नसलेल्या समीर यांच्या जन्म दाखल्या बाबत यास्मिन म्हणाल्या ‘समीर यांचा जन्म दाखला नवाब मलिकानांना का पाहीजे आणि तुम्ही कोण आहात जन्म दाखला काढणारे ? तुम्हाला तो अधिकार कोणी दिला या शब्दात त्यांनी मालिकांना सुनावले. तसेच नवाब मलिक यांचे शोध पथक मुंबईतून पोस्ट केलेल्या फोटोला दुबईतील दाखवते. त्यांच्या शोध पथकाला मेहनत करण्याची गरज आहे असा खोचक टोला यास्मिन यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

ज्या प्रकारे नवाब मलिक आमच्या कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत त्यानुसार आम्हीही दररोज खोटे पुरावे सादर करू शकतो असा खुलासा यास्मिन यांनी केला. या सोबतच दररोज आम्हाला धमकीचे फोन येता आहेत. दरम्यान क्रांती रेडकर यांनी सुद्धा माध्यमांसमोर सांगितले की, समीर या प्रकरणातून बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. तेव्हा मला त्याची काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहे. मला या प्रकरणाचा खूप त्रास झाला. मला माझ्याच महाराष्ट्रामध्ये येवून धमकावतो, यावेळी मला काहींनी सुरक्षा दिली आहे. आम्हाला ट्रोलिंग केले जात आहे. आम्हाला मारण्याची धमकी मिळते आहे. अनेकांना समीर वानखेडे नको आहेत. त्याचे कारणही सगळ्यांना माहिती आहे,असेही ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!