🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी झाली.
महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने जनता महाविकास आघाडीला कौल देणार का? याची उत्सुकता निर्माण झाली होती. आघाडीला घवघवीत यश मिळालं असून भाजपच्या हक्काच्या नागपूर व पुण्यातील जागांवर देखील आघाडीने झेंडा फडकवला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला असून मत देणाऱ्या उच्च शिक्षितांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील भाजपवर प्रहार केला आहे. ‘महाविकास आघाडीच्या वर्षभरातील कामाच्या जोरावर हा विजय मिळाला आहे. उच्च शिक्षितांनी सुद्धा महाविकास आघाडीलाच पसंती दिली आहे. तर, भाजप हा जनतेचा पक्ष नसून तो सत्तेत असताना फुगला होता. भाजप हवेत आला आणि हवेत गेला’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वस्व पणाला लावणाऱ्या भाजपचं हैद्राबादमध्येही ‘पानिपत’!
- तीन भा**ऊ पक्षांनी 2-3 जगा जिंकल्या म्हणजे पराक्रम नाही केला, राणेंची टीका करताना जीभ घसरली
- आजच्या पराभवाची नैतिक जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी घ्यावी- संजय काकडे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केला : सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

