Share

तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव

Published On: 

नागपूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मोठा विजय मिळवला आहे. मात्र यामध्ये पराभूत भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांची सर्वात मोठी अडचण झाली.

महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे आता तेलही गेलं आणि तूपही गेलं असे म्हणायची वेळ संदीप जोशींवर आली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाची कारण मीमांसा सुरू झाली आहे. महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोशींनी जो त्रास दिला, त्याचे परिणाम त्यांनी या निवडणुकीत भोगले, असा नेटकऱ्यांचा सूर आहे. तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना अगदी पहिल्या दिवसापासून महापौर-आयुक्त वाद सुरू झाला होता. तुकाराम मुंढे यांना अडचणीत पकडण्याची एकही संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडली नव्हती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!