Share

आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो; भाजपने केला तब्बल ६ हजार ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा

Published On: 

मुंबई : सोमवारी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत.

या निकालांमध्ये भाजपचं सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्यांना देखील मोठं यश मिळालं आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व नेते हे अधिक सक्रिय झालेले पाहायला मिळालं. निवडणूक जरी राजकीय पक्षांच्या आधारावर होत नसल्या तरी पुरस्कृत पॅनेल्ससाठी अनेक दिग्गज नेते या निवडणुकांसाठी प्रचार करताना देखील दिसले.

महाविकास आघाडीला एकत्रपणे घवघवीत यश मिळालं असलं तरी भाजपने देखील एकट्याने कडवी टक्कर दिली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं आहे.

‘राज्यातील १६०० बिनविरोध ग्रामपंचायतींपैकी आम्ही ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले. आम्ही कोणाच्याही विजयावर दावा करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरुन दावा करतोय. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो’ असा टोला देखील केशव उपाध्ये यांनी विरोधकांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!