ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिनबाद 4 धावा केल्या होत्या.
त्यामुळे पाचव्या दिवशी विजयसाठी आणखी 324 धावांची आवश्यकता होती. सामना रंगतदार स्थितीत होता. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.
दरम्यान, भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील रिषभ पंतला संघर्ष करावा लागला होता. तेथून रिषभ पंतची सुरुवात झाली. रिषभ पंतवर कसोटी सामन्यात देखील बऱ्याच टीका झाल्या. रिषभ पंत नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. कधी बायोबबल चे नियम तोडले म्हणून चर्चेत आला तरी कधी फंकी सनग्लासेस मुळे चर्चेचा विषय ठरला पण आज अखेर रिषभ पंतने टीकारांची बोलती आपल्या खेळीने बंद केली आहे. आज पंतने आपल्या खेळीने सगळ्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंवरील संकट दूर होण्यासाठी नगरसेवकाचे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दंडव
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?
- ‘इंदिरा गांधीही पराभूत झाल्या होत्या’, मुलीच्या पराभवावर पेरे पाटलांची प्रतिक्रिया
- येस बँकेला दिलासा ! निर्णायक बोर्ड मीटिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर वधारले…


