अहमदनगर:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. 34 जिल्ह्यांमधील जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याचा काल (18 जानेवारी) निकाल लागला आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीतील गुलाल खाली बसण्यापूर्वीच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्येही गुलाल उधळला आहे. महाराष्ट्रात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम असताना, तिकडे महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचं खंबीर नेतृत्त्व करत होता. भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने 3 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली.
दरम्यान, अजिंक्य रहाणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला आहे. चंदनापुरी हे त्याचं गाव आहे. चंदनापुरीतही रहाणेंच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. गावच्या या निवडणुकीत अजिंक्य रहाणेच्या घरातील किंवा नातेवाईक कोणीही उमेदवार नव्हतं. पण अजिंक्य रहाणेच्या या गावातील निवडणुकीकडे पंचक्रोशीचं लक्ष होतं.
या निवडणुकीत रामनाथ रहाणे यांच्या शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली असून 13 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. त्यांच्या विरोधातील ग्रामविकास मंडळाला तीन जागा मिळाल्या. या पॅनलचं नेतृत्त्व रामभाऊ रहाणे करत होते.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंवरील संकट दूर होण्यासाठी नगरसेवकाचे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दंडव
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?
- ‘इंदिरा गांधीही पराभूत झाल्या होत्या’, मुलीच्या पराभवावर पेरे पाटलांची प्रतिक्रिया
- येस बँकेला दिलासा ! निर्णायक बोर्ड मीटिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर वधारले…


