Share

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील

Published On: 

मुक्ताईनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे गेले वर्षभर भाजपमध्येच होते.

अनेकदा खडसेंची नाराजी समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार यावर शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी प्रवेशासाठी घटस्थापनेचा मुहूर्त हुकल्यानंतर ते या नवरात्रीतच सीमोल्लंघन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. उद्या २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची निश्चिती झाली असतानाच खडसेंनी भाजपला अखेर मोठा धक्का दिला आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपशी एकी ४० वर्षांची साथ अखेर सोडली असून त्यांनी राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला असल्याचे वृत्त समोर येत आहे. खडसेंच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक व निकटवर्तीय जमा झाले असून त्यांच्या सुनबाई व खासदार रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच राहणार असल्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!