मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून फरार आहेत. दोघांचाही शोध पोलिसांना लागत नाही. याबाबत भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर टीका करत आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याच मुद्द्यावरुन परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबईमधील एका कार्यक्रमात अमृता यांना या प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “पोलीस आयुक्त असो किंवा माजी गृहमंत्री असो त्यांचे हनीमून कुठे चालले आपल्याला माहित नाही. हे व्हायला नको हे खरे आहे. प्रसारमाध्यमांना ते कुठे दिसले तर रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकर पकडता येईल,” असं अमृता फडणवीस यांच्या या विधानावर सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दरम्यान, माजी पोलीस आयुक्त परमबी सिंह यांच्यावर दाऊद इब्राहिम चा सहकारी तारिक परवीन याने पोलीस कस्टडीत दिलेल्या जवाबानुसार सिंह यांना आरोपी करण्यात आले आहे. तर माजी गृहमंत्री परमबीर सिंह यांनी सचिन वाझे याच्यामार्फत बारचालकांकडून १०० कोटी वसूली प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत.
मात्र तेव्हापासून परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही फरार आहेत. त्यानंतर गुप्तचर विभागाने त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र ते हाती लागले नाहीत. परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी धाव घेतल्यानंतर राज्य सरकारने अटकेपासून संरक्षण देण्याची तयारी नसल्याचं स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कॅ.अमरिंदर यांच्या अपमानाच्या भांगड्यात भाजपचे ढोलवादक होते हे स्पष्ट झाले’
- हिवाळी अधिवेशनात आमदारांसह प्रत्येकाला डोस नंतरही ‘आरटीपीसीआर’ टेस्ट सक्तीची
- ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये..’म्हणत अनुष्काने केला विराटचा’तो’फोटो शेअर
- ‘मोदींच्या स्मार्ट सिटी, अमृत योजनांच्या अमिषाने शहरांची अधोगती झाली’, खा.वंदना चव्हाण यांचा आरोप
- गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सवाल


