🕒 1 min read
मुंबई : सध्या पती, मुलीत रमलेल्या अनुष्का शर्माने नुकताच एक फोटो शेअर केले आहे. ती अभिनयापासून दूर राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांसह बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील मोठया प्रमाणात पसंती दर्शविली आहे.
अनुष्का सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाली असून तिचे, पती विराट कोहली आणि मुलगी वामिका यांचे बरेच फोटो पोस्ट करत असते. नुकताच विराट आणि वामिकाचा खुप सुंदर फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये’. सोशल मीडियावर अनुष्काने जो फोटो शेअर केला आहे त्यास नेटकऱ्यांकडून भरपूर लाईक्स, कमेंट येत आहे. या फोटोमध्ये वामिका तिच्या पाळण्यामध्ये बसलेली दिसत आहे, आणि विराट तिला बघत तिला खेळवत आहे.
https://www.instagram.com/p/CVKserNswrb/?utm_medium=copy_link
विराट आणि अनुष्काचे फॅन्स या फोटोवर हार्ट वाली इमोजी बनवून ते या फोटोबद्दल असणारे प्रेम व्यक्त करत आहे. विराट आणि वामिका यांच्या फोटोवर सेलिब्रिटी रणवीर सिंगने कंमेंटमध्ये हार्टवाली इमोजी पोस्ट करत ‘हाय’ लिहिले आहे. रणवीरच्या या कंमेंटमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, वडील विराट आणि मुलगी वामिका यांच्या या कॅनडिड फोटोला पाहून रणवीर खूपच खुश झाला आहे. रणवीरसोबतच दिया मिर्जा, सुनील शेट्टी, रकुल प्रीत सिंह, नीति मोहन, सानिया मिर्जा आदी अनेक सेलिब्रिटींनी अनुष्काच्या या फोटोवर कमेंट्स केले आहेत. तसेच चाहत्यांनी तर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा
- ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
