Share

‘मोदींच्या स्मार्ट सिटी, अमृत योजनांच्या अमिषाने शहरांची अधोगती झाली’, खा.वंदना चव्हाण यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

अकोला : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी, अमृत योजना आदी विविध योजना जाहीर केल्या. मात्र या सर्व योजना फसव्या ठरल्या. या योजनांमुळे विकास तर झाला नाही, मात्र शहरांची अधोगती झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चव्हाण म्हणाल्या, जगात ३० शहरे सर्वात प्रदूषित आहेत. यापैकी दुर्देवाने २० शहरे आपल्या देशातील आहेत. त्यामुळेच या गंभीर बाबींवर काम करणे गरजेच आहे. मात्र यावर काम झाले नाही. केवळ योजना जाहीर करण्यात आल्या. यात स्मार्ट सिटी, अमृत योजना आदी विविध योजनांचे स्वप्न दाखवण्यात आले. परंतु या योजनांचा फायदा झाला नाही. त्यामुळे शहराचा विकास सोडा, अधोगती झाली. आता नागरिकांचा भ्रम दूर झाला आहे.

मागील निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले गेले. त्यामुळे मतदारांना आपला नगरसेवक कोण, ही बाबच लक्षात आली नाही आणि सत्तेत असलेल्या पक्षाकडे पाहून मतदान झाले. मात्र आता नागरिकांची निराशा झाली आहे. त्यांना बदल हवा आहे. आमचा पक्ष ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर काम करतो. मात्र, अर्बन सेलमुळे पक्ष १०० टक्के समाजकारण करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!