Share

अर्थसंकल्पातुन महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण, रेल्वे, क्रीडा, वाहतुक आदी क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शेती आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प. बंगाल, तामिळनाडू, आसाम या राज्यावरही योजनांची खैरात केली आहे. शेतकऱ्यांसाठी दीडपट ‘एमएसपी’ची तरदूत केली आहे. एकंदरीत सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना खुश केले आहे. अर्थसंकल्प जाहीर करायाल सुरुवात झाल्यापासून त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. विरोधक यावरून सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल,असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!