Share

संतापजनक: यवतमाळ मध्ये पोलिओ ऐवजी लहानग्यांना पाजल सॅनिटायझर

Published On: 

यवतमाळ: राज्यभरात पोलिओ लसीकरणाची मोहिमे मोठ्या थाटामाटात राबवण्यात आली. पण, यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. १२ बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आले. १ ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओची लस देताना हा त्यांना सॅनिटायझर पाजण्यात आले. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक माहिती समोर आली.

या १२ बालकांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांच्या पालकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आले होते, हे उघड झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुलांच्या पालकांनी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!