🕒 1 min read
मुंबई: RCB आज (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध IPL 2022 चा 22 वा सामना खेळणार आहे. या दोन्ही संघांचा हा IPL 2022 चा पाचवा सामना आहे. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे कारण चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. आता अशा परिस्थितीत सर्व चाहत्यांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील सामन्याकडे लागल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच चेन्नईने एक भावनिक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात चेन्नईचा माजी खेळाडू फाफ-डू-प्लेसीस आपल्या माजी सहकाऱ्यांना भेटताना दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये RCB चा माजी कर्णधार विराट कोहलीही दिसून येत आहे. RCB आणि CSK चे खेळाडू एकमेकांची गळाभेट करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला काही तासांतच इन्स्टाग्रामवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस यावेळी आयपीएलमध्ये आरसीबीचे कर्णधार म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. कर्णधार म्हणून पंजाबविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात त्याने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने अवघ्या 57 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज आपल्या पहिल्या विजयासाठी आज मैदानात उतरेल. त्यामुळे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अजिबात सोपा असणार नाही. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. पण संघाचा सामना प्रथम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर अनुज रावतशी होणार आहे. अनुज रावतने मुंबई इंडियन्स विरुद्धची धडाकेबाज खेळी खेळून स्वतःची ओळख करून दिली आहे. मागील सामन्यात अनुज रावतने 47 चेंडूत 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे आजचा सामना अधिक रोमांचक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
“JNU मध्ये हिंसा मांसाहारावरून झाली, पण भाजपवाले…”, राऊतांचा हल्लाबोल
“भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू”, संजय राऊतांचे टीकास्त्र
पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर
IPL 2022 SRH vs GT : हैदराबादनं रोखला गुजरातचा विजयीरथ; हार्दिकसेनेचा पहिला पराभव!
सदावर्तेंना मोठा झटका! 3 कोटींचा घोटाळा?; अकोटात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
