Share

“हिंदू-मुसलमानशिवाय भाजपकडे…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘भाजपला हिंदुत्वाशी घेणेदेणे नसून हिंदू-मुसलमानांत सदैव झगडा, त्यातून तणाव आणि अस्थिरता, त्याच तणावात हिंदू भावनांना हात घालून निवडणुका जिंकायच्या यापलीकडे यांच्या हिंदुत्वाची मजल नाही. त्याचे ताजे रटरटीत उदाहरण म्हणजे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपच्या विद्यार्थी संघटनेने केलेली हिंसा व राडा.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या काळात ‘हिजाब’ वाद निर्माण केला गेला व हिंदू भावनांना हात घातला. हिजाब प्रकरणातील एक सत्य मान्य करावेच लागेल की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गणवेश ठरलेला असतो व तो नियम पाळायलाच हवा. धार्मिक तसेच राजकीय मुद्दे शाळा-कॉलेजात नेता कामा नयेत, पण हे वाद उकरून काढायचे काम सध्या भाजपपुरस्कृत नवहिंदुत्ववादी करीत आहेत. हिजाबपाठोपाठ आता मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या परिसरात मुसलमानांची दुकाने लावू द्यायची नाहीत, त्यांना व्यवसाय करू द्यायचा नाही अशी मोहीम आता भाजपच्या नवहिंदुत्ववाद्यांकडून राबवली जात आहे. कर्नाटकात भविष्यात निवडणुका आहेत. त्याची तयारी ही अशा पद्धतीने सुरू झाली आहे. हिंदू-मुसलमानशिवाय भाजपकडे दुसरा कार्यक्रम नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!