Share

आम्हाला ब्रह्मज्ञान अन् त्यांच्यासाठी कोरडे पाषाण; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई : भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवरुन अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आजपासून जन आशिर्वाद यात्रेला सुरवात केली आहे. राणेंच्या जन आशिर्वाद यात्रेला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या जन आशिर्वाद यात्रेला हजेरी लावली आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघऩ करु नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनावरुन फडणवीसांनी जोरदार टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी चिंता करणं योग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी अशी काळजी करायलाच हवी. पण, अशी चिंता करताना त्यांनी राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे, काँग्रेसला सांगितलं पाहिजे आणि शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. केवळ, आम्हाला ब्रह्मज्ञान आणि त्यांच्यासाठ कोरडे पाषाण, असं मुख्यमंत्र्यांनी करू नये. हीच अपेक्षा, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. मुंबईतील जनआशीर्वाद यात्रेतील गर्दीवरुन विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलं.

मुंबई आणि महाराष्ट्रात भाजपला जे समर्थन मिळत आहे ते पाहून आमच्या विरोधकांना धडकी भरणारच आहे, असेही फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
आमचा डीएनए हा विरोधी पक्षातून झाला आहे. केसेस लावणं, पोलिसांचा बळाचा वापर आमच्यावर होणं हे आमच्यासाठी नविन नाही. हे वर्षानुर्षे आम्ही सहन केलं आहे. संषर्ष हा आमचा पिंड आहे. त्यामुळे पोलिसांच्या भरोस्यावर भाजपला तरी दापता येत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!